जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 09:03 PM2018-05-25T21:03:00+5:302018-05-25T21:03:00+5:30

गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागले. तर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.

An administrative relief to police inspector Sunil Kurade in Jalgaon local crime branch | जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा

जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना एक वर्ष मुदतवाढजिल्ह्यातून पाच अधिकाºयांची बदलीपरजिल्ह्यातून केवळ एकच पोलीस अधिकारी येणार

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२५ - गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागले. तर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.
राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी हे आदेश काढले. जळगावचे आदिनाथ बुधवंत यांची अमरावती ग्रामीण तसेच पाचोऱ्याचे श्याम सोमवंशी यांची नंदुरबार, जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रदीप ठाकुर यांची बुलढाणा तर वसंत मधुकर मोरे यांची अकोला, जळगाव येथील अनिल देशमुख यांची विनंती बदलीनुसार नवी मुंबई येथे बदली झाली आहे़
दरम्यान, नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे़ त्यामुळे सध्या जळगावात बाहेर जिल्ह्यातून एकच अधिकरी येणार आहे़

Web Title: An administrative relief to police inspector Sunil Kurade in Jalgaon local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.