Aditya Thackeray : जळगावात आदित्य ठाकरेंचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 13:48 IST2022-08-20T13:40:16+5:302022-08-20T13:48:01+5:30
Aditya Thackeray : शिवसेनेच्या महिला आघाडीकडून आदित्य ठाकरे यांचे औक्षण करण्यात आले. त्यावेळी त्यांना तलवार भेट म्हणून देण्यात आली.

Aditya Thackeray : जळगावात आदित्य ठाकरेंचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत
आकाश नेवे
जळगाव - शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंपर्क यात्रेसाठी शनिवारी जळगाव शहरात आले होते. त्यावेळी आकाशवाणी चौकात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर गाडी थांबवून राष्ट्रवादीने त्यांचे स्वागत केले. तर नंतर चौकाच्या बाजुलाच उभारलेल्या स्टेजवर शिवसेनेतर्फे तलवार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
आकाशवाणी चौकातील नियोजित कार्यक्रमाची वेळ १०.४० ची असतांना ठाकरे तब्बल दीड तास उशिराने या ठिकाणी आले. त्यानंतर पाचच मिनिटात दोन्ही पक्षांचे स्वागत स्विकारून ते नियोजित सभेसाठी पाचोरा येथे गेले.
राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी, सलीम इनामदार, मजहर पटेल, उज्ज्वल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या महिला आघाडीकडून आदित्य ठाकरे यांचे औक्षण करण्यात आले. त्यावेळी त्यांना तलवार भेट म्हणून देण्यात आली. या वेळी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, महापौर जयश्री महाजन, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, मंगला बारी, उपमहापौर कुलभुषण पाटील, नितीन लढ्ढा, नितीन बरडे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.