आॅनलाईन लोकमतपारोळा,दि.१३ : अमळनेर रस्त्यालगत असलेल्या बालाजी पार्कच्या आवारात पत्त्यांचा अड्डा सुरू असतांना तेथे वाद होऊन दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात चार जण जखमी झाले असून गुरूवारी रात्री उशिरा पो.स्टे. वर महिला व नागरिकांनी हल्लाबोल करत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आलाी.श्री बालाजी पार्क हे धार्मिक स्थळ असतांना त्या परिसरात पत्ता जुगार, गावठी हातभट्टी ची दारू यासह अनेक प्रकार याठिकाणी होत असताना रात्री ९.३० वाजेच्या सुमारास या परिसरात पत्त्यांचा अड्डा चालवणारे व खेळणाऱ्यांमध्ये बाचा बाची होत तुफान हाणामारी झाली. त्यात राहुल उर्फ बबलू शांताराम पाटील, भारत शांताराम पाटील यांना सुखदेव बलीराम भिल, सागर मोहन भिल यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. यात राहुल पाटील यांच्या डोक्यावर लाकडाने जबर मारहाण केल्याने त्याला तातडीने धुळे येथे हलविण्यात आले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पारोळ्यात पत्ते खेळण्यावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:42 IST
चार जण जखमी : नागरिक, महिलांचा पोलीस स्टेशनवर हल्लाबोल
पारोळ्यात पत्ते खेळण्यावरून हाणामारी
ठळक मुद्देहाणामारीच्या घटनेत चार जण झाले जखमीमहिलांनी केला पोलीस स्टेशनवर हल्लाबोलदोन्ही गटाच्या परस्परांविरूद्ध पोलिसात तक्रारी