मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील पिंप्रीनांदू नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या पथकाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर आणि एक डंपर अशी पाच वाहने जप्त केली. ही कारवाई पिंप्रीनांदू, बेलसवाडी आणि नायगाव रस्त्यांवर शुक्रवारी रात्री ११ वाजता करण्यात आली. जप्त केलेली वाहने मध्यरात्री बाराच्या सुमारास आणण्यात आली आहेत.प्रांताधिकारी रामसिंग सोलाने, तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तलाठी गणेश मराठे, एन.डी.काळे या पथकाने ही कारवाई केली.अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर एमएच-२८-बीबी-१२९२ यासह ट्रॅक्टर एमएच-१९-सीयू-५४८७, एमएच-१९-सीयू-२५४०, एमएच-१९-डीजी-५३३७, एमएच-१९-सीयू-७६४१ असे चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या वाहनांच्या मूल्यांकनाचे काम सुरू होते.
मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:50 IST
पिंप्रीनांदू नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या पथकाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर आणि एक डंपर अशी पाच वाहने जप्त केली.
मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई
ठळक मुद्देमहसूल प्रशासनाची कारवाईचार ट्रॅक्टर, एक डंपर जप्त