Acne dumper fined two crore three lakh for transporting acne in Jalgaon | जळगावात मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन डंपरला एक कोटी तीन लाखाचा दंड
जळगावात मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन डंपरला एक कोटी तीन लाखाचा दंड

जळगाव : मुरूमचा अवैधरीत्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मेहरूण परिसरात पकडून तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने संबंधित डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला आहे.
मेहरूण परिसरात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांना दोन डंपर मुरूमची वाहतूक करताना आढळून आले होते. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी या डंपरला थांबवून चौकशी केली असता डंपर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांना बोलावून डंपरची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदार हिंगे यांनी पंचनामा करीत उमाळे (ता.जळगाव) येथील शासकीय गटातून वाहन क्रमांक एम १९ सीवाय ५६६८ व एमएच १९-सीडब्ल्यू ५६६८ हे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करताना व एक पोकलँड अवैधरीत्या उत्खनन करताना उघड झाले. दोन्ही डंपर जप्त करून ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले आहेत. या प्रकरणात डंपर मधील मुरुम व उत्खनन केलेल्या जागेची चौकशी केली असता त्यात ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक मुरूम काढल्याचे आढळून आले.
यामध्ये नशिराबादचे मंडळ अधिकारी व पथकाने केलेला पंचनामा, जबाब, घटनास्थळाची पाहणी असता अवैधरीत्या वाहतूक करणारी वाहने दीपक दिलीप बोंडे (रा.जळगाव) यांची असल्याचे समजले. त्यांनी शिरसोली येथील तलावातून महामार्ग क्रमाक ५३ (जुना महामार्ग) च्या चौपदरीकरणासाठी मुरूम उत्खनन केले होते. उमाळा गट क्रमांक २०४ मध्ये १५०० ते १६०० ब्रास नवीन खोदकाम आढळून आले. उत्खननास परवानगी होती. मात्र उत्खनन सरकारी गट क्रमांक २०४मध्ये झालेले आढळून आले. अंदाजे ६०० ब्रास अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन झालेले पथकास आढळून आले. त्यावरून बोंडे यांना एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला असून तो भरण्याची नोटीसही देण्यात आली.

Web Title: Acne dumper fined two crore three lakh for transporting acne in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.