जानवे येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:26 PM2019-04-12T16:26:23+5:302019-04-12T16:26:35+5:30

कुटुंबाचा गेला आधार

An accidental death of a young man in Janawe | जानवे येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

जानवे येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

googlenewsNext


अमळनेर : धुळे रस्त्यावरील जानवे गावाजवळील अपघातातील जखमी तरुणाचा धुळे येथे रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
याबाबत वृत्त असे की, जानवे येथील अनिल दुर्योधन पाटील (वय ३०) हा ९ रोजी रात्री ९ वाजता अमळनेर कडे जात असताना जानवे गावापासून १ किमी अंतरावर मोरीत पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी धुळे येथे दाखल केले होते. पश्चात आई , पत्नी , दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान रस्त्यावर मोरीचे काम सुरु असल्याने यात पडून अनिलचा मृत्यू झाला. या ठिकाणी जाण्यास योग्य मार्ग नसल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अनिल हा घरातील कर्ता होता. त्याच्या मृत्यू मुळे त्याच्या कुटुंबियांचा आधार गेला असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: An accidental death of a young man in Janawe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात