अपघात जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:04+5:302021-01-18T04:15:04+5:30

याच जागेपासून काही अंतरावर गेल्या २४ डिसेंबर रोजी मीना किशोर तळेले (५३,रा.प्रभात कॉलनी) यांचा जीव गेला होता. तळेले दाम्पत्य ...

Accidental coupling | अपघात जोड

अपघात जोड

Next

याच जागेपासून काही अंतरावर गेल्या २४ डिसेंबर रोजी मीना किशोर तळेले (५३,रा.प्रभात कॉलनी) यांचा जीव गेला होता. तळेले दाम्पत्य एमआयडीसीतून दुचाकीने घरी जात असताना खड्डयामुळे तोल जावून मीना तळेले दुचाकीवरुन पडल्या होत्या व त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांना चिरडले होते. त्याआधी ११ डिसेंबर रोजी आहुजा नगराजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. त्यात अशोक सुखदेव रोकडे (रा.पिंप्राळा), पंढरी नामदेव नन्नवरे (रा.बांभोरी, ता.धरणगाव) हे दोघं जखमी झाले होते. मालवाहू वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने समोरुन येणाऱ्या ट्रकवर दुचाकी आदळली होती व त्यात फूटबॉलसारखे उडून नन्नवरे झाडाझुडपात खड्डयात पडले होते. त्याआधी ५ डिसेंबर रोजी शिर्डी येथून बंदोबस्त करुन आलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी (रा.हंबर्डी, ता.यावल ) शिरसोली रस्त्यावर ठार झाला होता. दुचाकी झाडावर आदळल्याची घटना घडली होती.

Web Title: Accidental coupling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.