अंत्यविधीला जाताना काळाचा घाला, विचखेडे जवळ अपघात; दोन ठार, २० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:45 IST2023-12-01T16:44:55+5:302023-12-01T16:45:22+5:30
पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात शुक्रवारी (दि.१) दुपारी साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाला.

अंत्यविधीला जाताना काळाचा घाला, विचखेडे जवळ अपघात; दोन ठार, २० जखमी
पारोळा (राकेश शिंदे - जि. जळगाव) : तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रक व जीपवर आदळून जोरदार अपघात झाला. या दुर्घटनेत दोन ठार तर जवळपास २० जण जखमी झाले. पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात शुक्रवारी (दि.१) दुपारी साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाला.
बोळे येथील २० ते२५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधीसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावानजीक हा भिषण अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलिस व चार ते पाच रुग्णवाहिका मदत कार्यासाठी धावल्या.जखमींवर कुटीर व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. मयतांची नावे कळू शकली नाही.