मिनी टेम्पोच्या धडकेत शिक्षकासह पत्नी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 16:47 IST2018-09-12T16:47:03+5:302018-09-12T16:47:28+5:30

मिनी टेम्पोच्या धडकेत शिक्षकासह पत्नी ठार
पारोळा (जळगाव) : कासोदा रस्त्यावरील चहुत्रे फाट्याजवळ मिनी टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात नगाव (पारोळा) येथील शिक्षक भागवत महादू पाटील (रा. मंगरूळ) तसेच त्यांच्या पत्नी अल्काबाई भागवत पाटील हे जागीच ठार. तर टेम्पो रस्त्यापलिकडे जाऊन उलटला.