Accident : आयशर ट्रक दुचाकीवर उलटता, भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू, तर पिता-पुत्र जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 12:00 IST2022-02-28T11:59:26+5:302022-02-28T12:00:03+5:30
Accident: सरकीने भरलेला आयशर दुचाकीवर उलटला. त्याखाली दाबले जाऊन दुचाकीवरील माय- लेकी ठार झाल्या. बाप व मुलगा जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता चोपडा अमळनेर रस्त्यावर घडली.

Accident : आयशर ट्रक दुचाकीवर उलटता, भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू, तर पिता-पुत्र जखमी
जळगाव- सरकीने भरलेला आयशर दुचाकीवर उलटला. त्याखाली दाबले जाऊन दुचाकीवरील माय- लेकी ठार झाल्या. बाप व मुलगा जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता चोपडा अमळनेर रस्त्यावर घडली.
उज्ज्वला जगदीश मोतीराळे (३२) व नेहा जगदीश मोतीराळे (११, रा.मामलदे ता. चोपडा) अशी ठार झालेल्या माय- लेकींची नावे आहेत. जखमी जगदीश भिमराव मोतीराळे (४२) व बावीन जगदीश मोतीराळे (१०) यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांनी उपचार केले. नंतर दोघांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.