शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अबोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:31 IST

जळगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’साठी ‘रंग प्रेमाचे’ या सदरात प्रेमाच्या विविध छटा व आविष्कार दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत. या लेखमालेतील आज पहिला भाग.

प्रणिता : प्रभास, प्रभास,... तुम्ही इथे कसे? इकडे कुणीकडे?प्रभास : कोण? प्रणिता? तू इथे कशी?प्रणिता : काय करणार? गाडी लेट आहे ना बरीच? मग बसा वाट पाहत तुम्ही...?प्रभास : तुम्ही, तुम्ही काय? आपण जुने कलीग्ज आहोत ना वर्गसोबती? मग? अग माझीही गाडी लेट आहे.प्रणिता : म्हणून इथे कॅटींनमध्ये?प्रभास : होना? काय करणार? मगाशी मी तुला पाठमोरी पाहिली. तेव्हा वाटलं, बहुतेक प्रणिता आहे.. त्या कोपऱ्यातल्या छोट्याशा देवळापाशी...प्रणिता : हो, बरोबर, गणपतीचे देऊळ आहे ना, नमस्कार करून घेतला. ते कसे राहील?प्रभास : जुनी सवय....प्रणिता : नेहमीची आणि तिथला तो अगरबत्तीचा सुवासप्रभास : हो तोसुद्धा गुलाब किंवा चंदन अगरबत्ती होना?प्रणिता : तुझ्या लक्षात आहे अजून?प्रभास : हो आणि अबोली किंवा बकुळीची फुले वाहायची आणि त्याचा गजरा पण..!प्रणिता : कमाल आहे तुझी... सगळंच आठवतंय की...प्रभास : ते राहू दे, पण आता काही तरी थोडंफार खाल्लं पाहिजे. त्या शेवटच्या टेबलवर बसायचं. दोनच खुर्च्या आहेत बघ तिथे.प्रणिता : हो तुझी सवय कोपºयातलं टेबलच पाहिजे...प्रभास : हो तुझ्यासाठी काय सांगू? व्हेजीटेबल, सॅण्डवीच ! पचायला हलकं? का आवड बदललीय अलीकडे?प्रणिता : नाही, नाही ! तेच सांग! आणि तुझ्यासाठी जीरा राईस !प्रभास : हो, करेक्ट ! (दोेघेही हसतात) काही म्हण प्रणिता पण तू काही बदलली नाहीस, आहेस तशीच आहेस! अ‍ॅण्ड इफ आय मे से सो, लुकींग ब्युटीफूल !प्रणिता : चल! काही तरीच काय! तूही तसाच स्मार्ट आहेस. उलट आणखी रुबाबदार.प्रभास : तू बेचाळीसची असून, चोविशीची वाटतेस.प्रणिता : छे ! अरे माझी मुलगी आता इंजिनिअरींगला आहे. बंगलोरला तिलाच भेटायला जायचं फर्स्ट इअर आहे.प्रभास : आणि मी निघालोय अहमदाबादला कॉन्फरन्सला.प्रणिता : तुम्ही काय बुवा मोठे बॉस, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे असशील ना?प्रभास : हो...! तू कसे काय ओळखलंस? आणि तू? तू काय?प्रणिता : आम्ही काय बाई! आम्ही आपले मध्यमवर्गीय! नवºयाच्या पगारात भागत नाही म्हणून नोकरी करायची!प्रभास : कॉफी सांगू ना- एस्पे्रसो?प्रणिता : आणि तुझी कॅपुचिनो?प्रभास : बरोबर.... (एक मिनिट स्तब्ध राहून) प्रणिता....प्रणिता : काय...?प्रभास : एक गोष्ट विचारू तुला?प्रणिता : विचार ना?प्रभास : तू... तू.... मला तेव्हा विचारले का नाहीस? कॉलेज संपताना...प्रणिता : कशाबद्दलप्रभास : लग्नाबद्दलप्रणिता : म्हणजे? मी.... मी..... तुला?प्रभास : हो पसंत होतीस! नुसती पसंत नाही, अतिशय आवडत होतीस...!प्रणिता : अरे ! तू मॅड आहेस का?प्रभास : हो मी मॅड होतो तेव्हा..!प्रणिता : तसं नाही? पण मी मी कशी विचारणार? मुली थोड्याच अशी गोष्ट स्वत: पहिल्यांदा विचारतील?प्रभास : स्वत: नाही तर तुझ्या मैत्रिणीकडून!प्रणिता : छे ! शक्यच नव्हतं! अरे तू तेव्हा कॉलेजातला एवढा स्मार्ट, हुशार, पॉप्युलर मुलगा, तुझ्या मागे इतक्या मुली... आणि मग तुच का नाही विचारले?प्रभास : मी? मी? मी घाबरलो.प्रणिता : तू तुझ्या मित्राकडून विचारायचे !प्रभास : खरंच कोणीतरी असा चांगला सल्ला देणारा ‘परिचय’ सिनेमातल्या मित्रासारखा भेटायला हवा होता, म्हणजे मी धाडस तरी केलं असतं.प्रणिता : जाऊ दे आता हे असेच रहायचे होते समज. अबोल अस्फूट....प्रभास : ओके प्रणिता, आता जाताना बाहेर कुठे तरी अबोलीचा गजरा घेशील ना?-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव