भुसावळात ट्रकने चिरडल्याने महिला ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:43 IST2022-01-31T12:43:07+5:302022-01-31T12:43:48+5:30
मीना मोहन अग्रवाल (५५, रा.ताराभवन, तु.सु.झोपे शाळेजवळ मेथाजी माळा, भुसावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

भुसावळात ट्रकने चिरडल्याने महिला ठार
भुसावळ जि. जळगाव : मंदिरात पूजा करुन घरी जात असताना मागाहून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास यावल रोडवर गांधी पुतळ्याजवळ घडली.
मीना मोहन अग्रवाल (५५, रा.ताराभवन, तु.सु.झोपे शाळेजवळ मेथाजी माळा, भुसावळ) असे मृत महिलेचे नाव आहे. शहर पोलिसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले आहे.