MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 20:02 IST2023-03-08T20:00:27+5:302023-03-08T20:02:52+5:30

MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

 A meeting has been organized on Thursday with the Industries Minister on the issues of MIDC | MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक

MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक

कुंदन पाटील 

जळगाव: येथील एमआयडीसीच्या विकासाआड येणाऱ्या विविध समस्यांसह अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी दि.९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक आयोजित केली आहे.

सामंत यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीसाठी स्थानिक उद्योजक, उद्योग विभागाचे प्रधान सचीव हर्षदीप कांबळे, ऊर्जा विभागाचे दिनेश वाघमारे, कामगार विभागाच्या विनिता सिंघल, विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह अधिकाी उपस्थित राहणार आहेत.ही बैठक जळगावच्या विकासासाठी महत्वपूर्ण सुरूवात ठरेल असा विश्‍वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.

 

Web Title:  A meeting has been organized on Thursday with the Industries Minister on the issues of MIDC