चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 20:11 IST2025-03-12T20:10:11+5:302025-03-12T20:11:58+5:30
चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती.

चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत
चाळीसगाव (जि. जळगाव) : ग्रामीण भागासह चाळीसगाव शहरातही बुधवारी सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज होऊन धक्के जाणवले. शहरात आणि ग्रामीण भागातही याभूकंपसदृश्य धक्क्यामुळे भांडी हलल्याचे अनेकांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रशासनाकडून मोठा आवाज झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. याबाबत आवाज नेमका कशाचा ? याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती. मात्र आवाज नेमका कशाचा ? हे समजू शकले नाही.
या घटनेबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागालाही कळविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरु नये, अशी माहिती तहसिलदार प्रशांत पाटील यांनी ''लोकमत''शी बोलतांना दिली.