सुटीवर आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 20:35 IST2024-10-09T20:35:22+5:302024-10-09T20:35:47+5:30

सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता.

A jawan on leave died due to lightning  | सुटीवर आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून मृत्यू 

सुटीवर आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून मृत्यू 

श्यामकांत सराफ/ पाचोरा : सुटीवर आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भातखंडे ता. पाचोरा शिवारात बुधवारी सायंकाळी ६:२० वाजेच्या सुमारास घडली.

भूषण आनंदा बोरसे (पाटील) (३३, रा. अंतुर्ली खुर्द ता. पाचोरा) असे या जवानाचे नाव आहे. ते काही दिवसांपूर्वी सुटीवर आले होते.  दुपारी ते भातखंडे शिवारात आपल्या शेतात गेले होते. सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे भूषण हे दुचाकीने अंतुर्ली येथील घराकडे परतत होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागीच ठार झाले.

Web Title: A jawan on leave died due to lightning 

टॅग्स :Jalgaonजळगाव