जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजता दुकानाला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 00:28 IST2022-04-17T00:27:21+5:302022-04-17T00:28:18+5:30
फुले मार्केटमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता पांचाली साडी सेंटर या दुकानाला अचानक आग लागली.

जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजता दुकानाला आग
जळगाव : फुले मार्केटमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता पांचाली साडी सेंटर या दुकानाला अचानक आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुशील हसवानी यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या या दुकानातून धूर निघत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला.ठाणे अंमलदाराने लागली अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली काही क्षणातच दोन बंब घटनास्थळी दाखल झाले पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यात लाखो रुपयांच्या साड्या जळाल्या असून काचाही फुटलेल्या आहेत. साडेबारा वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते दोन बंबाद्वारे आग विझवण्यात आली.