मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

By सागर दुबे | Updated: May 15, 2023 19:03 IST2023-05-15T19:03:47+5:302023-05-15T19:03:55+5:30

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

A child who went swimming with friends drowned | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

जळगाव : धानवड गावाजवळील तलावामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या करण जयराम पवार (११, रा.चिंचोली) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, सायंकाळी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी चिंचोली येथील करण हा गावातीलच आपल्या दोन सवंगड्यांसोबत धानवड गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेला. तिघांपैकी करण हा खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तलावात गाळ असल्यामुळे तो वर येवू शकला नाही. त्यामुळे अन्य दोघांनी आरडा-ओरड गेली. आरडा-ओरड एकून जवळच काम करणा-या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत करण याचा बुडून मृत्यू झाला होता.

Web Title: A child who went swimming with friends drowned