शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

गौरी गणपतीसाठी कोकणात जाणार ७५ बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST

एसटी महामंडळ : ऑनलाइन बुकिंगचे उत्पन्न जळगाव विभागाला मिळणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुढील आठवड्यापासून गणेशोत्सव सुरू ...

एसटी महामंडळ : ऑनलाइन बुकिंगचे उत्पन्न जळगाव विभागाला मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुढील आठवड्यापासून गणेशोत्सव सुरू होणार असून, या उत्सवासाठी एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातून कोकणात ७५ बस पाठविण्यात येणार आहेत. या बसच्या मोबदल्यात महामंडळातर्फे जळगाव विभागाला ऑनलाइन बुकिंगचे उत्पन्न मिळणार आहे.

दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. या गर्दीच्या अनुषंगाने रेल्वेतर्फे जादा रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळातर्फेही जादा बस सोडण्यात येणार आहेत. या सर्व बस मुंबई विभागातील कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल या भागातून कोकणात सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाण्यासाठी मुंबई विभागातील बसची संख्या अपूर्ण पडत असल्याने, महामंडळाने राज्यातील विविध विभागांतून मुंबईला जादा बस मागविल्या आहेत. यात जळगाव विभागातील ७५ बसचा समावेश आहे. या बस ७ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांतून मुंबईला रवाना होणार आहेत. या बससोबत चालक आणि वाहकही रवाना होणार असून, गणेशोत्सव संपल्यानंतरच या बस जळगावकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, गणेशोत्सवासाठी जळगाव आगारातर्फे श्रीक्षेत्र पद्मालय येथे जादा बस सोडण्यात येतात. यातून जळगाव आगाराला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडणार आहे.

इन्फो :

ऑनलाइन बुकिंगचे उत्पन्न जळगावला मिळणार

कोकणातील गौरी-गणेशोत्सवासाठी मुंबई विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी या बसचे ऑनलाइन तिकीट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून जे उत्पन्न येईल, महामंडळातर्फे ते पैसे जळगाव विभागाला देण्यात येणार आहेत, तसेच बससोबत जाणाऱ्या चालक-वाहकांनाही नियमानुसार जादा भत्ता देण्यात येणार असल्याचे जळगाव महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.