५८ ‘रोवर्स’ धावले ७ हजारांवर शेतकऱ्यांच्या मदतीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 06:14 PM2024-07-10T18:14:18+5:302024-07-10T18:14:28+5:30

जळगावकर आघाडीवर : भुसावळ,भडगाकर मात्र पिछाडीवर

58 'Rovers' ran to help over 7,000 farmers! | ५८ ‘रोवर्स’ धावले ७ हजारांवर शेतकऱ्यांच्या मदतीला!

५८ ‘रोवर्स’ धावले ७ हजारांवर शेतकऱ्यांच्या मदतीला!

कुंदन पाटील/जळगाव:  जिल्हा भूमिअभिलेख विभागाला ५८ रोवर्स युनिट मशिन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेतजमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटपासह जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होत आहे. या रोवर्सच्या मदतीने मोजणी पूर्ण करण्यात जळगावकर आघाडीवर आहेत.
या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागत नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार आहे. त्यामुळे अनेक जण रोवर्सची मदत घेताना दिसत आहेत.

यंत्रे उपलब्ध
सध्या स्थितीला १५ तालुक्यांाठी ५८ रोवर्स मशीन उपलब्ध आहेत. जळगावच्या प्रशासनाला सर्वाधिक रोवर्स मिळाले आहेत. जळगावला ८, भडगाव ३, पाचोरा ४, चाळीसगाव ४, पारोळा ३, एरंडोल ३, धरणगाव ३, अमळनेर ४, चोपडा ३, यावल ४, भुसावळ ३, बोदवड ३, जामनेर ६, मुक्ताईनगर ३ व रावेरला ४ मशिन्स  देण्यात आले आहेत.

भुसावळ पिछाडीवर
रोवर्सच्या मदतीने शेतजमीन मोजणी करण्यात भुसावळ सर्वात मागे आहे. भुसावळकरांनी आतापर्यंत ११६ शेतजमिनींची मेाजणी केली आहे. त्यानंतर भडगावकरांनी १४९ जमिनींची मोजणी केली आहे. जळगावमधील ११६० शेतजमिनींची मोजणी झाली आहे.

तालुकानिहाय मोजणी प्रकरणे
जळगाव : ११६०
भडगाव : १४९
पाचोरा : ५२०
चाळीसगाव : ५०६
पारोळा : ३२०
एरंडोल : ३२५
धरणगाव : ४८६
अमळनेर : ६७४
चोपडा : ५७४
यावल : ३९०
भुसावळ : ११६
बोदवड : २१३
जामनेर : ६९०
मुक्ताईनगर : ३५५
रावेर : ७३९
एकूण : ७२१६

Web Title: 58 'Rovers' ran to help over 7,000 farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.