शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात अंदाजे ५८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 10:41 PM

सर्वाधिक ६७ टक्के मतदान रावेर मतदार संघात

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदार संघात २१ रोजी अंदाजे ५८ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक ६७ टक्के मतदान रावेर मतदार संघात तर सर्वात कमी ४५ टक्के मतदान जळगाव शहर मतदार संघात झाले. दरम्यान, जिल्ह्यात २१ ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये किरकोळ बिघाड झाल्याने ते बदलवावे लागले. मात्र मतदान प्रक्रिया कोठेही थांबली नसल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने मिळाली.जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघासाठी एकूण १०० उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर या ११ विधानसभा मतदार संघासाठी २१ रोजी सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरु झाले. दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला.सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान (टक्क्यामध्ये)चोपडा- ६०रावेर- ६७भुसावळ- ४६जळगाव शहर- ४५जळगाव ग्रामीण- ५८अमळनेर- ६२एरंडोल- ६०चाळीसगाव- ५८पाचोरा- ५७जामनेर- ६३मुक्ताईनगर- ६४एकूण - ५८दिव्यांग, महिला, नवमतदारांनी स्वयंस्फूर्तीने केले मतदानजळगाव : सुलभ निवडणूक हे ब्रीद घेऊन निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांना विशेष व्यक्तींचा दर्जा दिल्याने दिव्यांग मतदारांसह महिला मतदार, नवमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याने जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील ३५८६ मतदार केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधांसह पाळणाघराचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. तर काही ठिकाणी पालकांसोबत मतदान केंद्रावर आलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी खेळणी व खाऊचीही व्यवस्था करण्यात आली होती. पाळणाघरात अंगणवाडी सेविका लहान मुलांची काळजी घेत होत्या.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात ११ मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे गुलाबपुष्प देऊन व औक्षण करुन स्वागत करण्यात येत होते.रावेर येथील सखी मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी फेटे परिधान केले होते. अनेक ठिकाणी मतदारांचे औक्षणही करण्यात येत होते. तसेच अनेक मतदार केंद्रावर सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र तयार करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी मदत करण्यात येत होती. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, शौचालयाची व वैद्यकीय सुविधेसह निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरीकांना मदत करण्यासाठी स्काऊट गाईडची मुले, विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मदत करीत होते.या निवडणुकीत मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनविषयीही मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आपण मतदान केलेल्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी स्क्रिनवर बघायला मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील अंदाजे ३९ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आलेली होती हे नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असल्यामुळे त्यांच्या चेहºयावर उत्साह दिसून येत होता.निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात होता. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मतदान केंद्रावरील पोलीस सहकार्य करीत होते.सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाJalgaonजळगाव