जळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:08 IST2018-10-19T13:08:24+5:302018-10-19T13:08:50+5:30

आतीषबाजीने वेधले लक्ष

51 gallons of Ravana combustion in Jalgaon | जळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन

जळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन

जळगाव : विजयादशमीनिमित्त एल. के. फाउंडेंशनतर्फे मेहरुण तलाव चौपाटीवर रावण दहन करण्यात आले. पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी लाकडाचा वापर न करता यंदा प्रथमच लोखंडी पाईपाचा वापर करुन रावणची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते रावणाचे दहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी महापौर ललित केल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी शहरवासीयांची मोठी गर्दी झाली होती.
गेल्या सहा वर्षांपासून एल.के. फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. चार दिवसांपासून प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु होते. यासाठी २५० किलो लोखंडी पाईप वापरण्यात आले आहेत.
रावण दहनाच्या पार्श्वभूमीवर शिरसोलीकडून येणारी वाहतूक मोहाडी रस्त्याने वळविण्यात आली होती.

Web Title: 51 gallons of Ravana combustion in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.