शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

४० वर्षात शिवणी पाझर तलावाचा आटला नाही मायेचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:21 IST

यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागवत आहे. भीषण दुष्काळात तो या भागासाठी वरदान ठरला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या जीवन रुपी झळादगडामंधी दडलाय जलभाव दुष्काळात भागली आठ गावातील गुरा-ढोरांची तहान अन् फुलली वनरोपवाटिका

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागवत आहे. भीषण दुष्काळात तो या भागासाठी वरदान ठरला आहे.४० वर्षात कोरडा नाहीचशिवणी गावापासून दोन कि.मी.वर वनविभागात हा पाझर तलाव आहे. त्यास पूर्वापार देव्या, लवणाचे धरण’ हे नाव देव्या नावाच्या वेलवर्गीय वनस्पती या नाल्यात आढळते असे. त्यावरुन पडले आहे. १९७५ मध्ये या पाझर तलावाचे काम सुरू झाले ते १९७९-८० दरम्यान पूर्णत्वास आले. गाढवावरुन माती-मुरुम टाकत धरणाचा भराव घालण्यात आल्याचे पूर्वज सांगतात. तेव्हापासून हा पाझर तलाव एकदाही कोरडा पडलेला नाही. १९८५ पर्यंत या भागातून जामदा उजवा कालवा बारमाही पाण्याने वाही तेव्हा या पाझर तलावाचे महत्व कुणाला वाटले नाही. कालवा बसला तेव्हापासून मात्र तो वरदायी ठरत आहे. ४० वर्षात तो दुष्काळ असो की अवर्षण एकदाही कोरडा पडलेला नाही.आठ गावाच्या गुराढोरांना वरदानया पाझर तलावास लागून हजारो हेक्टर वनक्षेत्र आहे. वनास लागून महिंदळे, पळासखेडा, तरवाडे,ता. पारोळा, शिंदी, खेडगाव, बात्सर, शिवणी, वडगाव, नालबंदी ही आठ गावे येतात. रान जवळ असल्याने या गावातून पूर्वीपासून पशुपालन होते. गाय-गव्हारे आहे. एरव्ही जंगलात चरावयास जाणारी वरील गावांची जनावरे या पाझर तलावावरच पाणी पिण्यासाठी येतात. मात्र या दुष्काळात विहिरींनादेखील पाणी नाही. यामुळे इतरही हजारोच्या संख्येने असलेली गुरे-ढोरे या पाझरतलावाच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. जगली आहेत.वनविभागाची रोपवाटिकाही तरलीया पाझर तलावात उन्हाळ्यातही पाणी टिकून राहते म्हणून वनविभागाने येथे दोन वर्षांपासून वन रोपवाटिका उभारली आहे. या दुष्काळात यातील पाण्यामुळे एक लाखावर रोपांना जीवदान मिळाले आहे.याशिवाय या तलावातील पाण्यावर मासेमारी चालते. दरवर्षी याचा लिलाव होतो.पाझरतलाव नव्हे दगडी वॉटर टँकया वनक्षेत्रातील इतर पाझर तलाव कोरडे पडले आहेत. मात्र भौगोलिक दृष्ट्या खोलगट दगडावर शिवणी पाझर तलावाचा बॅकवॉटर एरिया येतो. एरव्ही नावाप्रमाणे इतर पाझरतलावास थोडाफार पाझर खालच्या भागात होत असल्याने मार्च महिन्यापर्यंत ती कोरडी होतात. पण शिवणी पाझर तलावाचा एक टिपूसही (थेंब) खाली पाझरत नाही. हेच वैशिष्ट्य आहे. यामुळे हा पावसाळा ते पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी टिकून राहते. यामुळेच दुष्काळावर मात करण्यासाठी अशा दगडी वॉटरटँकची निर्मिती काळाची गरज आहे. 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव