४ दिवसात खड्डे बजुले नाही तर खड्ड्यात टाकणार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:57 IST2018-08-30T17:52:34+5:302018-08-30T17:57:48+5:30
जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला.

४ दिवसात खड्डे बजुले नाही तर खड्ड्यात टाकणार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा गुरुवारी त्यांनी जळगाव पंचायत समितीत घेतला. यावेळी ते बोलत होते.
रस्त्यांची झालेली दुरवस्था, किरकोळ कारणांमुळे नामंजूर करण्यात येत असलेली शासकीय योजनांची गोरगरीबांची प्रकरणे, दाखल्यांसाठी सर्वसामान्यांची होणारी दमछाक आणि कामांची बिले मंजूर करण्यासाठी अधिकाºयांकडून पैशांची मागणी या मुद्यांवरुन गुलाबराव पाटील यांनी उपस्थित अधिकाºयांचे कान उपटले.