अनैतिक संबंधातून २८ वर्षीय तरुणाचा खून; जळगावमधील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:13 IST2022-03-26T11:09:32+5:302022-03-26T11:13:25+5:30

अमित खरे, असे मारेकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

28-year-old murdered in immoral relationship; Thrilling incident in Jalgaon | अनैतिक संबंधातून २८ वर्षीय तरुणाचा खून; जळगावमधील थरारक घटना

अनैतिक संबंधातून २८ वर्षीय तरुणाचा खून; जळगावमधील थरारक घटना

जळगाव: शहरातील समता नगरात सागर नरेंद्र पवार (वय २८) या तरुणाचा खून झाला आहे. पहाटे पावणे तीन वाजता घरातच त्याच्यावर हल्ला झाला. पोती उचलण्याच्या हूकने मानेवर हल्ला करण्यात आला आहे.

अमित खरे, असे मारेकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सागर याचे खरे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, त्यातून हा खून झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी तसेच मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमितने शनिवारी पहाटे सागरच्या घरी जात त्याच्यावर शस्त्राने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सागरला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती खालावल्यानं त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सागर हा समतानगरात एकटाच राहत होता. मोलमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. त्याची आई मानसिक रुग्ण असून, वडील बाहेरगावी राहत असल्याची माहिती मिळाली.

Web Title: 28-year-old murdered in immoral relationship; Thrilling incident in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.