पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत सूर्यभान झाल्टे (वय ३५, रा. प्रेमनगर) हे ६ सप्टेंबर रोजी विवेकानंद बगीचाजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांचा मोबाइल लांबविला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, हा गुन्हा भोलासिंग जगदीशसिंग बावरी याने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली होती. त्यावरून हवालदार महेंद्र बागूल, मनोज पवार, फिरोज तडवी, तुषार जावरे, योगेश साबळे, समाधान पाटील, सलीम तडवी, संतोष सोनवणे व रेहान खान यांनी संशयिताचा शोध घेतला असता भोलासिंग मिळून आला, तर त्याच्याकडे चौकशी केल्यावर काल्याचे नाव पुढे आले. दरम्यान, भोलासिंग याला न्यायालयात हजर केले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यात आणखी एका जणाचे नाव निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास हवालदार महेंद्र बागूल करीत आहेत.
तब्बल २० गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST