उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By विजय.सैतवाल | Updated: August 18, 2023 15:29 IST2023-08-18T15:28:57+5:302023-08-18T15:29:26+5:30
औद्योगिक वसाहत परिसरातील जनता ट्रान्सपोटजवळ एका ट्रकमध्ये उडीद डाळीचे ५० किलो वजनाचे ४६ कट्टे भरलेले होते. ती ट्रक रात्री तेथे उभी असताना त्यामधून वरील सर्व कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.

उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : ट्रान्सपोर्टजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ५९ हजार ९०० रुपये किमतीची उडीद डाळ चोरुन नेली. ट्रकमधील तब्बल ४६ कट्टे लांबविण्यात आले. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते पहाटे पाच वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
औद्योगिक वसाहत परिसरातील जनता ट्रान्सपोटजवळ एका ट्रकमध्ये उडीद डाळीचे ५० किलो वजनाचे ४६ कट्टे भरलेले होते. ती ट्रक रात्री तेथे उभी असताना त्यामधून वरील सर्व कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.
ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर अभिषेक अशोक जाजू यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत.