जळगावमध्ये १५ वर्षीय मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:34 IST2020-08-30T15:33:20+5:302020-08-30T15:34:05+5:30
योगिता हिने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

जळगावमध्ये १५ वर्षीय मुलीची आत्महत्या
जळगाव : रामेश्वर कॉलनीत योगिता लिलाधर जयकर (१५, रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ) या मुलीने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. योगिता हिने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री योगिता घराशेजारील एका रिकाम्या खोलीत आली. तेथे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७.३० वाजता ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी योगिता हिला खाली उतरवून दोन रुग्णालयांमध्ये नेले. तत्पूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. योगिता ही कुटुंबीयांसह राहत होती. उपनिरीक्षक संदीप पाटील व कॉ.विश्वजित सोनवणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळी चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते. योगिताच्या पश्चात आई, मोठी बहिण व लहान भाऊ असा परिवार आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"
बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का
काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र
माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या