बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:45 IST2022-09-19T17:45:19+5:302022-09-19T17:45:47+5:30
नदीला पूर आल्याने तामसवाडीपासून अमळनेरपर्यंत बोरी नदीवर असलेले छोटे पूल पाण्यात गेले आहेत. नदीवरील सर्व जोडरस्ते बंद करण्यात आले आहेत.

बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडले
भूपेंद्र मराठे -
पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरण क्षेत्रात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बोरी धरणाचे १५ दरवाजे सोमवारी दुपारी १२वाजाता उघडण्यात आले आहेत. त्यातून १८००० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नदीवरील रस्ते बंद
नदीला पूर आल्याने तामसवाडीपासून अमळनेरपर्यंत बोरी नदीवर असलेले छोटे पूल पाण्यात गेले आहेत. नदीवरील सर्व जोडरस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यात बोळे ते तामसवाडी, शिरसोदे ते पारोळा, भिलाली ते अमळनेर असे जोड रस्ते बंद रण्यात आले आहेत. प्रवाशी वाहनधारकांनी पर्यायी रस्त्याने प्रवास करावा, असे आवाहन पारोळा तहसीलदार अनिल गवांदे यांनी केले आहे.