दुभाजकावर चारचाकी आदळून नवरदेवासह १० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 17:24 IST2018-05-12T17:24:21+5:302018-05-12T17:24:21+5:30
पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्रीजवळ दुभाजकावर कार आदळल्याने त्यात नवरदेव समाधान प्रकाश पाटील याच्यासह दहा जण जखमी झाले. अपघातात नवरदेवाचा हात व पाय मोडला आहे.

दुभाजकावर चारचाकी आदळून नवरदेवासह १० जण जखमी
लोकमत आॅनलाईन
पारोळा, जि. जळगाव, दि. १२ : भरवस ता. अमळनेर येथील नवरदेव शनिवार दि १२ रोजी पहाटे ६ वाजता पैठण येथे लग्नस्थळी जात असताना रत्नापिंप्री ता. पारोळा या गावाजवळ असलेल्या दुभाजकावर त्याची कार आदळल्याने त्यात नवरदेव समाधान प्रकाश पाटील याच्यासह दहा जण जखमी झाले. अपघातात नवरदेवाचा हात व पाय मोडला आहे.
अपघातातील इतर जखमींमध्ये मनीषा दगडू पाटील (२५) संगीता सोनू पाटील ( २४) अश्विनी प्रविण सूर्यवंशी (१६) हर्षदा कांतीलाल पाटील (१६) पियुष दगडू पाटील(६) स्वप्निल साहेबराव पाटील (३५) सीमा रविंद्र पाटील (३०) दगडू साहेबराव पाटील(२०) कविता समाधान पाटील (३०) नंदिनी भास्कर देशमुख (६०) हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, डॉ धनंजय पाटील यांनी उपचार केले. अपघातात नवरदेव समाधान याचे हात व पाय मोडला गेल्याने त्याला धुळे येथे हलविण्यात आले आहे.