ट्रकवर बस धडकल्याने विद्यार्थिनींसह १० प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:19 IST2018-10-26T12:18:14+5:302018-10-26T12:19:00+5:30
वरणगाव-भुसावळ दरम्यान अपघात

ट्रकवर बस धडकल्याने विद्यार्थिनींसह १० प्रवासी जखमी
वरणगाव, जि. जळगाव : पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी बस ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात सहा विद्यार्थिनींसह १० प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ झाला.
भुसावळ - जुनोना ही बस (क्र. एम.एच. २०, १६५९) जुनोना गावाकडे जात असताना पुढे जाणा-या ट्रकने अचानक ब्रेक दाबले. त्या वेळी मागून येणारी बस थेट ट्रकवर जोरदार धडकली. यात सहा शालेय विद्यार्थिनींसह दहा जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.