युवक पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:56 PM2019-10-12T23:56:17+5:302019-10-12T23:56:56+5:30

भोकरदन तालुक्यातील चांधई टेपली येथील एक २३ वर्षीय युवक विहिरीत पाय घसून पडला. ही घटना शनिवारी दुपारी घडली

The youth fell into the well | युवक पडला विहिरीत

युवक पडला विहिरीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई टेपली येथील एक २३ वर्षीय युवक विहिरीत पाय घसून पडला. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, या युवकाचा शोध घेण्यासाठी दोन विद्युत पंप लावून पाण्याचा उपसा केला जात आहे.
चांधई टेपली येथील दिलीप सीताराम टेपले (२३) हा युवक शनिवारी दुपारी शेतात गेला होता. मात्र, विहिरीजवळ गेल्यानंतर पाय घसरल्याने तो आतमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच राजूरचे सहायक फौजदार शंकर काटकर, जमादार विष्णू बुनगे, गणेश मांटे, होमगार्ड परमेश्वर टेपले, अण्णा टेपले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते.
काही युवकांनी विहिरीतील पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्यात यश आले नाही. सायंकाळी दोन विद्युत पंप, इंजिनच्या सहायाने विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला होता. ४० फुटांवर पाणी असल्याने रात्री उशिरापर्यंत पाण्याचा उपसा सुरू होता. विहिरीचे बांधकाम न झाल्याने तो गाळात रुतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: The youth fell into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.