युवक काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:30 IST2019-09-09T00:30:35+5:302019-09-09T00:30:59+5:30
जिल्ह्यातील एका तरूणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाली नसल्याच्या व प्रशासनाच्या अयोग्य तपासाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील मामा चौकात ‘रिमाइंडर’ निदर्शने करण्यात आली.

युवक काँग्रेसची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील एका तरूणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाली नसल्याच्या व प्रशासनाच्या अयोग्य तपासाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील मामा चौकात ‘रिमाइंडर’ निदर्शने करण्यात आली.
अत्याचाराच्या सर्वच प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, पीडितेला न्याय मिळवून द्यावा आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, दीपक कायंदे, इब्राहिम कायमखानी, महेश दसपुते, रफिक कादरी, राजीव जाईबहार, नानासाहेब जाधव, भगवान देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समोवश होता.