बरंजळा साबळे येथील स्मशानभूमीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:10+5:302021-03-05T04:30:10+5:30

हादी बेगम महेबूब अली शेख यांचा सत्कार जालना : शहरातील मूर्गी तलाव परिसरातील नगरपरिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका हादी बेगम ...

Work on the cemetery at Baranjala Sable begins | बरंजळा साबळे येथील स्मशानभूमीचे काम सुरू

बरंजळा साबळे येथील स्मशानभूमीचे काम सुरू

Next

हादी बेगम महेबूब अली शेख यांचा सत्कार

जालना : शहरातील मूर्गी तलाव परिसरातील नगरपरिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका हादी बेगम महेबूब अली शेख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरपालिकेचे शिक्षण सभापती आमेर पाशा, विजय फुलंब्रीकर, शिक्षणाधिकारी सुरेश सांगुळे, इरशाद कादरी, शबाना बेगम, शोभा टेकूर, मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरेशी, संतोष बोर्डे, मीना गोंटे, इरशाद कादरी, अब्दुल कादरी आदींची उपस्थिती होती.

११४० जणांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अंबड : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या मोहिमेत ज्येष्ठांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. त्यातील १,१४० ज्येष्ठांची पुणे येथील रूग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. त्यातील काही ज्येष्ठांना नुकतेच शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी या भागातील पदाधिकारी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Work on the cemetery at Baranjala Sable begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.