रूई येथील महिला दारूबंदीसाठी सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:15 IST2019-03-16T00:14:39+5:302019-03-16T00:15:32+5:30

गोंदी पोलीस ठाण्याच्या च्या हद्दीत अवैधरित्या विक्री होत असलेली दारू पुर्णपणे बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रूई येथील महिलांनी शुक्रवारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोउपनि. हनुमंत वारे यांना दिले आहे.

The women in Rui were forced to take liquor | रूई येथील महिला दारूबंदीसाठी सरसावल्या

रूई येथील महिला दारूबंदीसाठी सरसावल्या

ठळक मुद्देपन्नास महिला : गोंदी पोलिसांना दिले निवेदन

गोंदी : गोंदी पोलीस ठाण्याच्या च्या हद्दीत अवैधरित्या विक्री होत असलेली दारू पुर्णपणे बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रूई येथील महिलांनी शुक्रवारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोउपनि. हनुमंत वारे यांना दिले आहे.
रुई येथे अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री दारू विक्री सुरू आहे. यामुळे तळीराम घरी वाद- विवाद करतात. तसेच गावातच दारू मिळत असल्याने अनेक जण दारूच्या आहारी गेले आहेत. अगोदरच पडलेल्या दुष्काळामुळे आर्थिक चणचण जाणवत आहे. यासाठी महिला मजूरी करून पैस कमावत आहेत. मात्र, तळीराम या पैशावर व्यसने पूर्ण करित आहेत.
यामुळे या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असेही महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दारू विक्रेत्यांवर होणार कारवाई
दरम्यान गोंदी पोलीस ठाण्याचे पोउपनि. हनुमंत वारे यांनी दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून रूई येथील दारूविक्री बंद करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी सरपंच सुदाम राठोड, यांच्यासह रूई येथील ५० महिलांची उपस्थिती होती.

Web Title: The women in Rui were forced to take liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.