गोदापात्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:15 IST2018-09-28T01:15:08+5:302018-09-28T01:15:29+5:30

सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहित महिलेने गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील साडेगाव येथे घडली

The woman's suicide by taking a plunge in Godavari | गोदापात्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

गोदापात्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी : सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहित महिलेने गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील साडेगाव येथे घडली. गीता रमेश खोजे असे मयत विवाहितेचे नाव आहे.
तीन वर्षापूर्वी गीता हिचा विवाह रमेश खोजे यांच्याशी झाला होता. काही महिने संसार सुरळीत सुरु होता. मात्र विविध कारणांवरुन सासरच्या मंडळीनंी गीता हिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला कंटाळून गुरुवारी गीताने गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, सासरच्या छळाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद वडील रामभाऊ तुळशीराम आकात यांनी गोंदी पोलिसांत दिली. यामुळे सासू व्दारकाबाई खोजे, पती रमेश खोजे, सासरा मुंजाबा खोजे, दीर संजय खोजे यांच्याविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The woman's suicide by taking a plunge in Godavari