धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:32+5:302021-05-22T04:28:32+5:30

मयत शेख जमिला शेख अमीर फोटो क्रमांक -२१ जेएनपीएच ०१ जालना : जालना शहराजवळील जामवाडी तलावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या ...

A woman who went to wash clothes drowned | धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

मयत शेख जमिला शेख अमीर

फोटो क्रमांक -२१ जेएनपीएच ०१

जालना : जालना शहराजवळील जामवाडी तलावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. शेख जमिला शेख अमीर (३०), असे मयत महिलेचे नाव आहे.

शेख जमिला शेख अमीर व काजल राजू मंजूळकर (१३) या दोघी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जामवाडी तलावात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धूत असताना काजलचा पाय घसरून ती खोल पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी शेख जमिला शेख अमीर या पाण्यात गेल्या. तिला वाचविण्याच्या नादात शेख जमिला यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काजलने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेख जमिला शेख यांचा मृतदेह बाहेर काढला. काजल मंजूळकर हिला जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जमिला शेख यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: A woman who went to wash clothes drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.