जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:23 IST2018-09-12T17:21:53+5:302018-09-12T17:23:03+5:30
बसस्थानक परिसरात मौल्यवान वस्तु चोरणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अबंड येथून अटक केली.

जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत
जालना : बसस्थानक परिसरात प्रवाशांची नजर चुकवून पर्स व बॅग मधील दागिने व मौल्यवान वस्तु चोरणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अबंड येथून अटक केली. मंदाकीनी गिन्यानदेव भोसले (रा. शारदा नगर अबंड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून १ लाख ६५ हजारांचे दागिनेही ताब्यात घेतली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह अंबड येथील शारदा नगर येथून मंदाकीनी भोसले, सुरेखा पवार, सुरेखा काळे यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, या महिलांनी जालना बसस्थानकावर २३ आॅगस्ट रोजी एका महिला प्रवाशी आपल्या पती व लहान मुलासह बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्स मधील दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबूल दिली. तसेच सातारा येथे बसमध्ये महिला प्रवाशाचे पर्स चोरल्याची कबुल या महिलेने दिली आहे. सदर महिलेकडून तिने तिच्या साथीरांसह १ लाख ६५ हजार रुपयाचे दागिने हस्तगत केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिह गौर, जयसिंह परदेशी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, रामेश्र्वर बघाटे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी यांच्यासह आदींनी केली.