शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सहा महिन्यांत ड्रायपोर्टचे काम पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:06 AM

ड्रायपोर्टचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना त्यांची उत्पादने थेट परदेशात निर्यात तसेच परदेशातून आयात करण्यासाठी जालन्यातील ड्रायपोर्टचे मोठे योगदान राहणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी जमीन संपादनासह रेल्वे ट्रॅक आणि सुरक्षाभिंत उभारणीवर जवळपास २०० कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. आणखी १७० कोटी रूपयांची गरज असून, या प्रकल्पाचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा आमचा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.संजय सेठी यांच्यासह जेएनपीटीचे मुख्य अभियंता एस.व्ही. मदाभावी, सहायक प्रबंधक आर.बी. जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश निºहाळी यांनी सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी सेठी यांनी दानवे यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. २०१५ मध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास तत्कालीन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला होता. हा प्रकल्प जालन्यात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा मंत्री झालेल्या जालन्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात खेचून आणला होता.यासाठी दरेगाव, खादगाव या शिवारातील जवळपास ५०० एकर जागा संपादित केली गेली. गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाच्या ५०० एकर जागेला सुरक्षा भिंत बांधून पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मालाची ने-आण रेल्वेने करणे सोयीचे व्हावे यासाठी दिनेगाव रेल्वे स्थानक आणि ड्रायपोर्टच्या जवळपास तीन किलोमीटर परिसरात स्वतंत्र रेल्वे ट्रॅक जेएनपीटीने बांधला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सेठी यांनी दानवे यांना दिली.दरम्यान, आजचा हा आपला दौरा प्रत्यक्ष पाहणी करून नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी असल्याचे सेठींनी सांगितले. यावेळी येथे खाजगी उद्योगांकडूनही छोटे-मोठे उद्योग उभारण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात येऊन परिसर विकसित केला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जेएनपीटीचे येथील संचालक विवेक देशपांडे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात सर्वात प्रमुख मुद्दा असलेल्या कस्टम क्लिअरंन्स मुद्दा निकाली काढण्यात आला. त्यामुळे आता जालन्यातूनच माल निर्यात करण्याच्या सर्व त्या तांत्रिक बाबी पूर्ण होणार असून, येथून निर्यात करण्यासाठी ज्या देशात तो माला पाठवायचा आहे. ते तो जाण्यासाठी जेएनपीटीतून थेट बोटीत चढविता येणार आहे. यामुळे मोठा वेळ आणि खर्च वाचणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उद्योजक सतीश अग्रवाल, अर्जुन गेही आदींची उपस्थिती होती.इंधन बचत : पर्यावरणास लाभमुंबई पर्यंत जाण्यासाठी रस्ते वाहतुकीचा वेळ तसेच जेएनपीटीत माल पोहोचल्यावर थेट पूर्वी कस्टम ड्युटीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीचा वेळ खर्ची होणार नाही.यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होऊन पर्यावरणासाठी यामुळे मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी दरेगाव, खादगाव येथे भेट देऊन पाहणी केली. औरंगाबादेतील बैठकीत उद्योजक डी.बी. सोनी, रितेश मिश्रा, घनश्याम गोयल, गोविंद गोयल, अनुज अग्रवाल, मुकुंद मंत्री यांची उपस्थिती होती.

टॅग्स :MIDCएमआयडीसीraosaheb danveरावसाहेब दानवेroad transportरस्ते वाहतूकrailwayरेल्वे