चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:14 IST2019-12-26T01:13:16+5:302019-12-26T01:14:11+5:30

ख्रिश्चन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्यााची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.

 Will fund the development of the church - Gorontail | चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल

चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील क्राईस्ट चर्च कॅथेड्रल व टॉम डॉप्सन मेमोरियल या दोन्ही चर्चमध्ये ख्रिश्चन समाज बांधवांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासह चर्चच्या विकासासाठी लागणारा निधी टप्प्या- टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ख्रिश्चन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्यााची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.
नाताळ सणानिमित्त आ. गोरंट्याल यांनी बुधवारी क्राईस्ट चर्च कॅथेड्रल व टॉम डॉप्सन मेमोरियल या दोन्ही चर्चला भेट देऊन उपस्थित ख्रिश्चन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. ख्रिश्चन समाज बांधवांच्यावतीने आ. गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्राईस्ट चर्च कॅथेड्रल चर्चचे अध्यक्ष रेव्ह. आर. आर. सोजवळ, रेव्ह. एम. डी. जाधव, मराठवाडा धर्म प्रांताचे सचिव विवेक निर्मळ, सुरेश हातागळे, ए. डी. गडकरी, नुतन वसाहत भागातील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चचे अध्यक्ष रेव्ह. बी. बी. कांबळे, डॉ. लालबहाद्दूर कांबळे, सचिव जॉर्ज उगले, खजिनदार अश्विन सिंग, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष शेख महेमूद, न. प. सभापती रमेश गौरक्षक, नगरसेवक महावीर ढक्का, जगदीश भरतिया, माजी नगरसेवक वैभव उगले, विनोद यादव, नगरसेविका मनिषा कांबळे, संजय पाखरे, नितीन गायकवाड, विरेंद्र गायकवाड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Web Title:  Will fund the development of the church - Gorontail