जामखेड येथे कु-हाडीने घाव घालून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:36 IST2018-03-23T00:54:34+5:302018-03-23T11:36:24+5:30

अंबड तालुक्यातील जामखेड येथे माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने डोक्यात कु-हाडीने घाव घालून खून केला.

Wife murdered by husband at Jamkhed | जामखेड येथे कु-हाडीने घाव घालून पत्नीचा खून

जामखेड येथे कु-हाडीने घाव घालून पत्नीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने डोक्यात कु-हाडीने घाव घालून खून केला. बुधवारी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मंदा लहू गायकवाड (३० रा. आगलावे गेवराई, जि.औरंगाबाद) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
सासरी कौटुंबिक वाद होत असल्याने आठवडाभरापूर्वी जामखेड येथे माहेरी आल्या होत्या. बुधवारी दुपारी पती लहू रामभाऊ गायकवाड (३६) हा जामखेड येथे आला. तू माहेरी का आली, असे म्हणत लहूने पत्नीसोबत वाद घातला. वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात लहू गायकवाड याने पत्नी मंदाच्या डोक्यात कु-हाडीने पाच वार केले. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. या प्रकारानंतर लहू गायकवाड पळून गेला. स्थानिकांनी जखमी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मंदा यांना तपासून मृत घोषित केले.
गुरुवारी दुपारी बारा वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबडचे पोलीस निरीक्षक रफिक शेख, जामखेड पोलीस चौकीचे जमादार पी.डी. पाटील यांच्यासह आयबाईक पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.

Web Title: Wife murdered by husband at Jamkhed