शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

टरबूज उत्पादक चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण अंबड : कोरोना लसीकरण मोहिमेत तालुक्यातील महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास मत्स्योदरी विद्यालयातील केंद्रावर प्रारंभ करण्यात ...

महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण

अंबड : कोरोना लसीकरण मोहिमेत तालुक्यातील महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास मत्स्योदरी विद्यालयातील केंद्रावर प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र तलवाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास रोडे, नायब तहसीलदार बाबुराव चंडोल, भागवत देशमुख आदींची उपस्थिती होती.

महा-रेशीम अभियानास पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

हसनाबाद : जालना : शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात फिरविण्यात येणाऱ्या महा- रेशीम रथाचे उद्घाटन सोमवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर येथे आयोजित कार्यक्रमात टोपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डी. ए. हाके, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, व्ही. आर. कोलाल, सुनील काळे, नामदेव मुंडे, शिवाजी जायभाय आदींची उपस्थिती होती.

सातोना येथे माता रमाई यांना अभिवादन

सातोना : परतूर तालुक्यातील सातोना येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. ऋतुजा इंगळे, इशानी खरात या विद्यार्थिनींनी गीत सादर केले. कार्यक्रमास विलास आकात, विलास पाटील, राजू मगर, प्रभाकर कांबळे, लक्ष्मण वाहूळ, विकास खरात, तुकाराम खरात, अंकुश खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

वीजपुरवठा विस्कळीत; शेतकऱ्यांची गैरसोय

भोकरदन : सध्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यात विजेअभावी शेतातील पिकांना पाणी देतानाही शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने अधिकची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळीही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी होत आहे.