रांजणी परिसरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:48 IST2018-12-02T00:48:31+5:302018-12-02T00:48:51+5:30
रांजणी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.च्या तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे.

रांजणी परिसरात पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.च्या तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. तब्बल १८ दिवसानंतर एकदाच पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू आहेत.
नळ योजनेच्या विहीरींना पाणीच नसल्याने गावाला पाणी पुरवठा करणे अवघड झाले आहे यामुळे नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊण तहाण भागवण्याची वेळ आली आहे. अल्प पर्जन्यामुळे पाणी पातळी कमालीची खालवली आहे नदी नाले कोरडे पडले आहेत आता विहीरींनी सुध्दा तळ गाठला आसल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहे
गावाला पाणी पुरवठा करणाºया परिसरातील चित्रवडगाव, येवला, देवळी, परिसरातील विहिरींनी हिवाळ्यात तळ गाठला आहे.यामुळे ग्रामस्थांना टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना भुर्डड सहन करावा लागत आहे. दिवाळीपासून गावात पाणी टंचाई आहे. आता महिना झाला तरी अद्यापही ग्रा.पं.प्रशासनाने कुठलीच सोय केली नाही. गावात अठरा दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता.ग्रामस्थांनी ग्रा.पं. प्रशासनाला धारेवर धरुन प्रशासनाला जाब विचारला. मात्र अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांत संताप आहे.