शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:45 IST

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले असून राजूरसह परिसरात पाणीसमस्येने रोैद्र रूप धारण केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.यावर्षी दुष्काळाच्या दाहकतेने नागरिक हैराण आहेत. त्यातच पाणी समस्येने सर्वत्र नागरिक त्रस्त आहे. चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून राजूरसह परिसरातील पंधरा गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा केला होता. तसेच सध्या शासकीय टँकरने भोकरदन शहरासह सुमारे ४० गावातील ग्रामस्थांना बाणेगाव धरणाच्या आसपासच्या विहिरी अधिग्रहण करून शासकीय टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात होती. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून बाणेगाव धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे आसपासच्या विहिरींचा जलस्त्रोत कमी पडला आहे. विहिरीत मुबलक जलसाठा उपलब्ध होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंतीची वेळ आली आहे. विहीरींची सुध्दा पाणीपातळी खालावल्याने भोकरदन शहराला होणाऱ्या टँकरच्या फे-या कमी करण्यात आल्या असून बाणेगाव प्रकल्पात गेल्या दोन वर्षापूर्वी चर खोदून जलस्त्रोत तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, धरणात खडक असल्याने तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे यावर्षी चर खोदण्याचा प्रयत्न झाला नाही.परिसरातील चाळीस गावांना होणा-या टँकरच्या फेºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथे खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून बाणेगाव चांधई एक्को धरणाच्या आसपासच्या विहिरीतून खाजगी टँकरचालक पाणी आणून विक्री करीत होते. परंतु, विहिरींची पाणी पातळी खालावल्याने टँकर चालकांना पाणी मिळत नाही.पाणी समस्या गंभीर बनल्याने टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. विकत पाणी घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.उन्हाळ््याच्या अंतिम टप्प्यात पाणी समस्येने रौद्र रूप धारण केल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची सोय करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन खाजगी टँकरच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ