वंजारी समाजबांधवाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:55 IST2019-01-18T00:54:39+5:302019-01-18T00:55:39+5:30

अहमदनगर येथे संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी अंबड तहसील कार्यालयावर वंजारी समाजबांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

Warjari community's protest rally | वंजारी समाजबांधवाचा मोर्चा

वंजारी समाजबांधवाचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : अहमदनगर येथे संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी अंबड तहसील कार्यालयावर वंजारी समाजबांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी
तहसीलदारांना निवेदन देऊन मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील वंजार गल्ली येथून सुरुवात झालेला निषेध मोर्चा
महाराष्ट्रव्दार, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जालना-बीड मार्ग, मुख्य बसस्थानक मार्गे अंबड तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Warjari community's protest rally