शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांनी धर्मप्रसाराचे काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजूर : वारकऱ्यांनी गावागावात जावून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या गाथांचा प्रसार करून धर्मप्रचारकाची भूमिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजूर : वारकऱ्यांनी गावागावात जावून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या गाथांचा प्रसार करून धर्मप्रचारकाची भूमिका निभावावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

राजूर येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सोहळा सुरू आहे. यानिमित्त रविवारी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दानवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञानानंद बाबा, विठठल महाराज जगताप, गणेश देवा, भगवान महाराज यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राला साधू-संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून खेड्यातील लोकांना एकत्र आणून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे वारकऱ्यांनीसुध्दा खेड्यात जावून धर्म प्रचारकाची भूमिका निभावणे आवश्यक आहे. राजुरेश्वर संस्थानचा अलिकडे झपाट्याने विकास होत असल्याने अल्पावधीत शिर्डी, शेगाव संस्थानच्या धर्तीवर राजुरेश्वर संस्थानचा विकास करण्यास कटिबध्द असल्याचे दानवे म्हणाले. राजुरेश्वर जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात सर्वात मोठा असणारा हरिनाम सोहळा यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साेहळ्याची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याचे दानवे म्हणाले.

तत्पूर्वी आप्पासाहेब पुंगळे व अर्जुन मांगडे यांच्यावतीने दानवे यांची पेढे तुला व ५०१ नारळ फोडण्यात आले. यावेळी शेषराव जायभाये, सरपंच भाऊसाहेब भुजंग, विष्णू महाराज सास्ते, शिवाजी पुंगळे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, एकनाथ महाराज, विष्णू राज्यकर, गजानन नागवे, ओंकारसिंह शेखावत, विनोद डवले, पंढरीनाथ करपे, राहुल दरक, आप्पासाहेब पुंगळे, अर्जुन मांगडे, गोरखनाथ कुमकर, भगवान नागवे, श्रीरामपंच पुंगळे, गजानन जामदार, सुदाम पुंगळे यांच्यासह भाविक उपस्थित होते. ह. भ. प. विष्णू महाराज सास्ते यांनी सूत्रसंचालन करताना उपस्थितांचे आभार मानले.

फोटो