जालन्यात विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:21 IST2019-02-16T00:20:36+5:302019-02-16T00:21:14+5:30

श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान, जिल्हा जालनाच्या वतीने १७ फेब्रुवारी, रविवार रोजी भगवान श्री विश्वकर्मा जयंती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishwakarma Jayanti Nilitra Program in Jalna | जालन्यात विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम

जालन्यात विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान, जिल्हा जालनाच्या वतीने १७
फेब्रुवारी, रविवार रोजी भगवान श्री विश्वकर्मा जयंती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबड रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ, रंगनाथ नगर येथून सकाळी ९ वाजता शहर प्रदक्षिणा रॅली काढण्यात येईल. त्यानंतर श्री विश्वकर्मा प्रतिमा पूजन कार्यक्रमास उद्घाटक राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विशेष अतिथी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास पांचाळ सुतार समाजबांधवांनी उपस्थित राहावे.

Web Title: Vishwakarma Jayanti Nilitra Program in Jalna