अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बनवला व्हिडिओ; दोन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:24 IST2021-08-14T12:22:17+5:302021-08-14T12:24:11+5:30
Rape on Minor Girl in Badanapur : या दुर्दवी घटनेनंतर मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बनवला व्हिडिओ; दोन आरोपी अटकेत
बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील कंडारी खु येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार ( Rape on Minor Girl ) करून त्याची मोबाईलमधे शुटीग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ( Video made by raping a minor girl; Two accused arrested in Badanapur)
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी लक्ष्मणनगर तांडा या गावाकडे जात होती. ती एकटी असल्याची संधी साधत सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे या नराधमांनी तिला शेजारच्या शेतात ओढून नेले. तीच तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. मुलीने या घटनेची वाच्यता करू नाही म्हणून आरोपींनी मोबाईलमध्ये अत्याचाराचे शुटींग केले. व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली.
या दुर्दवी घटनेनंतर मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आली. मुलीची अवस्था पाहून नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असलेला मोबाईल जप्त करण्यात आला. बदनापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.