वाहन चोरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:30 AM2021-07-31T04:30:16+5:302021-07-31T04:30:16+5:30
जालना : शहरातून छोटा हत्ती चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) ...
![Vehicle thief arrested | वाहन चोरणारा अटकेत Vehicle thief arrested | वाहन चोरणारा अटकेत](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/jalna-marathi-default-image_202012530688.jpg)
वाहन चोरणारा अटकेत
जालना : शहरातून छोटा हत्ती चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार वाहने जप्त करण्यात आली आहे.
२६ जुलै रोजी जालना शहरातून छोटा हत्ती चोरी गेल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. हा छोटा हत्ती सराईत गुन्हेगार गजानन सोपान शिंगाडे याने साथीदारांसह चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून त्याला ताब्यात घेऊन वाहनाबद्दल विचारले असता, त्याने साथीदारांसह चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हवालदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, पोलीस नाईक विनोद गडधे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, रवी जाधव, परमेश्वर धुमाळ, रमेश पैठणे यांनी केली आहे.