अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून; सामनगाव परिसरात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:55 IST2021-07-09T11:52:38+5:302021-07-09T11:55:23+5:30

Murder in Jalna : या महिलेचा दुसरीकडे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सामनगाव शिवारात फेकून दिला असावा, अशी शक्यता

Unknown woman stoned to death; Body found in Samangaon area | अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून; सामनगाव परिसरात आढळला मृतदेह

अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून; सामनगाव परिसरात आढळला मृतदेह

ठळक मुद्देमृत महिलेच्या एका हातावर विशाल नाव गोंदलेले आहे. ओळख पटू नये म्हणून मृत महिलेचा चेहरा पूर्णपणे विद्रूप केला आहे

जालना : तालुक्यातील सामनगाव येथे महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत या महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Unknown woman stoned to death; Body found in Samangaon area of jalana ) 

सामनगाव रोडवरील नळकांडी पुलावर गुरुवारी सकाळी एका महिलेचा दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. हा घातपाताचा संशय असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास शेळके कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. ओळख पटू नये म्हणून मृत महिलेचा चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आलेला होता. प्रथमदर्शनीच हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवला. 

मृत महिलेच्या एका हातावर विशाल नाव गोंदलेले आहे. तालुका पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. काही ठाण्यांमधील बेपत्ता महिलेचे रेकाॅर्डही तपासले. दरम्यान, या महिलेचा दुसरीकडे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सामनगाव शिवारात फेकून दिला असावा, अशी शक्यता पोलीस निरीक्षक शेळके यांनी वर्तविली आहे.
 

Web Title: Unknown woman stoned to death; Body found in Samangaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.