अनियंत्रित जीप औरंगाबाद- जालना सीमेवरील चेकपोस्ट घुसली; दोन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 10:21 IST2021-05-22T10:20:25+5:302021-05-22T10:21:06+5:30
पुण्याहून जालनाकडे येत असणारी एक जीप ( क्रमांक एम एच 42 एक्स 16 87 ) औरंगाबाद- जालना सीमेवर अनियंत्रित झाली.

अनियंत्रित जीप औरंगाबाद- जालना सीमेवरील चेकपोस्ट घुसली; दोन पोलीस जखमी
बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील वरुडी शिवारात जालना-औरंगाबाद सीमेवर नूर हॉस्पिटलसमोरील बदनापूर पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये भरधाव वेगातील एक अनियंत्रित जीप घुसल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. यात दोन पोलीस जखमी झाले असून जीपचा चालक फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून जालनाकडे येत असणारी एक जीप ( क्रमांक एम एच 42 एक्स 16 87 ) औरंगाबाद- जालना सीमेवर अनियंत्रित झाली. यामुळे जीपने पहिल्यांदा रोडवरील एका दुकानाला धडक दिली. त्यानंतर रस्त्यावरील पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये जीप घुसली. यात पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन जारवाल व चंद्रकांत लोखंडे हे जखमी झाले आहेत. त्यांना जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या जीपवर ईपास चिटकलेला आहे. हा मेडिकल इमर्जन्सी म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेला असल्याचे दिसते. अपघातानंतर जीपचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.जीप बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात दोन प्रवासी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांनी दिली आहे.